सोलापूर – यलगुलवार प्रशालेच्या मैदानावर झालेल्या शालेय शहर सेपक टकरा स्पर्धेत एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने 14,17 व 19 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावीत तिहेरी मुकुट संपादला.
14 व 17 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात त्यांनी सेंट थॉमस स्कूलला 2-0 ने हरविले. तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या गटात राज मेमोरियल स्कूलला 2-0 ने नामविले. या कामगिरीवर तिन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
संघास क्रीडा शिक्षक नावेद मुनशी, इकबाल दलाल व अल्ताफ सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान, परजाना नदाफ, फौजिया खरेदी, रियाज सय्यद, जाकीर शहापुरे, इद्रीस पेरमपल्ली, फरहत शेख, आयान बागवान ,जैद हन्नुरे,अजमल काझी आदींनी अभिनंदन केले.
—-
विजयी संघ : 14 वर्षाखालील : जोहरा शेख, फातिमा शेख, जैनब बागवान, ओमाना शेख, तमन्ना शेख. 17 वर्षाखालील : असीला शेख. खुतेजा बेगम शेख,अकसा बागवान, शालेहा पठाण, अलीना शेख.
19 वर्षाखालील : अलमिनाज शेख, मिसबा पटेल, निकत बागवान, आयमन शेख, साजिया डोंगरे.






















