सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 27 वर्षीय अविवाहित तरुणाने घराजवळील मंदिरासमोर लाकडाच्या वाश्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बाळे येथील ठोकळ नगरात आज रविवारी पहाटे दीड वाजता उघडकीस आली.
चंद्रकांत शिवाजी जाधव (वय 27 वर्ष, राहणार ठोकळ नगर, बार्शी रोड बाळे, सोलापूर) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. तो वरील ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसोबत भाड्याने राहून वडिलांबरोबर बांधकामाचे काम करायचा. शनिवारी रात्री सर्वजण आपापल्या खोलीमध्ये झोपले असता पहाटे दीड वाजेच्या सुमारास शेळ्या- बोकडांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने आई घरा जवळील मंदिरासमोर आली तेव्हा मुलगा चंद्रकांत हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्यांनी त्वरित घरच्यांना ओरडून ही कल्पना दिली. नातेवाईकांच्या साह्याने गळफास सोडवून त्याला खाली उतरविले. यादरम्यान ही खबर फौजदार चावडी पोलिसांना मिळताच हवालदार विजय कसबे यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात पहाटे तीन वाजता शव विच्छेदनासाठी दाखल केला. मयत चंद्रकांत च्या पश्चात आई वडील, दोन भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 7