अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता पूर्ण महाप्रसाद हेच ध्येय ठेऊन गेली ३९ वर्षे अविरत स्वामी भक्तांना सेवा देत असल्याचे मनोगत माजी मंत्री, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते- नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे काका यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, रेखीव प्रतिमा देण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, मल्लिनाथ बंडगर, संजय प्रचंडे, हर्षदीप गायकवाड, विजय स्वामी, दत्तात्रय कवठे, सुरेश पाटील, राहुल पाटील, गजानन जक्कीकोरे आदिजन उपस्थित होते.
याप्रसंगी न्यासचे संतोष भोसले, सौरभ मोरे, ज्ञानेश्वर भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, पिट्टू साठे, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, किरण साठे, असद फुलारी, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, महांतेश स्वामी, राहुल इंडे, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 15