सोलापूर : भाजीपाला भरून विक्रीसाठी घेऊन निघालेल्या टमटम वाहनाला पाठीमागून आयशर टेम्पो धडक दिल्याने झालेल्या अपघातात टमटम चालक जागीच ठार झाल्याची घटना सोलापूर बोरामणी मार्गावर दोड्डी पेट्रोल पंपाजवळ आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.
हरून बाबुलाल बागवान (वय 52 वर्षे, रा. सग्गम नगर, सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मयत हरून बागवान हे सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथून भाजीपाला घेऊन ते विक्रीसाठी टमटम मध्ये घेऊन जात असतात. त्याप्रमाणे ते आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टमटम मध्ये भाजीपाला भरून बोरामणीच्या दिशेने विक्रीसाठी जात होते. यावेळी दोड्डी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या टमटमला मागून येणाऱ्या आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
मयत हरून बागवान यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 13