अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत मंदिर समितीने उत्कृष्ट नियोजन केले आहे. रांगेत कोणालाही त्रास होणार नाही, स्वच्छता, पाणी, प्रसाद व्यवस्था अतिशय चांगली आहे. मंदिर समितीचे मनापासून अभिनंदन, कारण भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत वटवृक्ष मंदिर समितीचे काम उत्कृष्ट असल्याचे मनोगत पुणे मनपाचे माजी नगरसेवक व भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष मा.नितीन शिंदे यांनी व्यक्त केले.
नुकतेच नितीन शिंदे व भाजपा महिला पुणे शहर सरचिटणीस शर्मिला शिंदे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी नितीन शिंदे व शर्मिला शिंदे यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी
भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष मा.नितीन शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना नितीन शिंदे म्हणाले की श्री स्वामी समर्थांच्या या पवित्र स्थानावर आयुष्यभर महिन्यातून एकदा तरी यावे अशी माझी इच्छा आहे, ती स्वामी समर्थानी पूर्ण करण्याची मानसिक व शारीरिक बळ स्वामिनी मला द्यावे एवढेच स्वामींच्या चरणी मागणे असल्याचे मनोगतही व्यक्त करून आमच्या या सन्मानाबद्दल मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे आम्ही अत्यंत आभारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, सागर गोंडाळ आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10