Sunday, July 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही!

तरुण भारतbyतरुण भारत
May 29, 2026
in social
0
पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही!
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

     रत्नागिरी – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर, मुंबई (शिवाजी पार्क) येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे. ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्यापासून वाचवण्यासाठी व तिचे ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जतन करण्यासाठी आज हिंदु जनजागृती समिती व समविचारी संघटना यांच्या वतीने येथील जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले.

     या आंदोलनात श्री. राजेश आयरे (अध्यक्ष, शिक्षक परिषद रत्नागिरी), श्री. नीलेश आखाडे (रत्नागिरी शहर सरचिटणीस, भाजप), श्री. संदीप नाचणकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, दक्षिण रत्नागिरी), श्री. संजय जोशी (महाराष्ट्र संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ), श्री  अनंत आगाशे (अध्यक्ष, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा), श्री. शैलेश बेर्डे (रत्नागिरी शहर उपाध्यक्ष, भाजप), श्री. गणेश गायकवाड (जिल्हाध्यक्ष, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी), अधिवक्ता श्री सचिन रेमणे (विश्व हिंदु परिषद, धर्मप्रसार विभागप्रमुख), श्री. समीर करमरकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), सौ. शुभांगी मुळ्ये (सनातन संस्था) यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी नागरिकांनी सावरकरांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आणि ‘सावरकर सदन वाचवा’ अशा घोषणा दिल्या.

     आंदोलनादरम्यान हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गोविंद भारद्वाज म्हणाले की, जिन्ना हाऊसला संरक्षण, मग सावरकर सदनावर पडझड का? भारताच्या फाळणीला आणि लाखो हिंदूंच्या कत्तलीला कारणीभूत असणाऱ्या महंमद अली जिन्ना यांचे मुंबईतील ‘जिन्ना हाऊस’ स्वतंत्र भारतात सुरक्षित राहते; मात्र अखंड भारतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानाला पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याची वेळ येते, हे दुर्दैवी आहे.

     केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर कोट्यवधी रुपये खर्चून ताब्यात घेतले, तसेच इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे. त्याच धर्तीवर स्वा. सावरकर तब्बल ४ दशके (वर्ष १९३८ ते १९६६) राहिले त्या ‘सावरकर सदना’चेही शासनाने त्वरित संपादन करावे.बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्ष २०१० मध्येच या वास्तूचा वारसा (Heritage) यादीत समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली आहे; मात्र गेल्या १५ वर्षांत शासनाने यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. याच फायदा घेऊन बिल्डर लॉबी ही वास्तू बळकावण्याचा प्रयत्न करत आहे.

      आंदोलकांद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यामध्ये सरकारने ‘सावरकर सदन’ पुनर्विकासाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा आणि या वास्तूचे ‘राष्ट्रीय स्मारकात’ रूपांतर करावे. या वास्तूची मालकी सरकारने स्वतःकडे घेऊन तिथे सावरकरांच्या हस्तलिखितांचे, पत्रांचे भव्य संग्रहालय, संशोधन केंद्र आणि डिजिटल लायब्ररी विकसित करावी. विद्यमान महायुती सरकारने नेहमीच स्वा. सावरकरांच्या विचारांचा गौरव केला आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव, संसदेतील तैलचित्र, १०० रुपयांचे स्वा. सावरकरांचे स्मारक नाणे काढले आहे. त्यामुळे या वास्तूच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करून सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा याच सरकारकडून आहे.

      जर शासनाने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सावरकरप्रेमी जनतेला सोबत घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेवटी समितीच्या वतीने देण्यात आला.

Post Views: 45
Previous Post

सांगोला शहरासह तालुक्यात बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण 

Next Post

‘वॉरियर्स’ व ‘किंग्स’ संघांची बाजी; निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी इंटर क्लब  स्पर्धा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘वॉरियर्स’ व ‘किंग्स’ संघांची बाजी; निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी इंटर क्लब  स्पर्धा

'वॉरियर्स' व 'किंग्स' संघांची बाजी; निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी इंटर क्लब  स्पर्धा

ताज्या बातम्या

कार चालकावर गोळीबार प्रकरणी  आणखी एकाला अटक – अटकेतील आरोपींची संख्या पाचवर

कार चालकावर गोळीबार प्रकरणी  आणखी एकाला अटक – अटकेतील आरोपींची संख्या पाचवर

July 19, 2026
दु:ख आणि दारिद्र्याच्या परिघातून नखाळीची निर्मिती झाली -डॉ. रणधीर शिंदे 

दु:ख आणि दारिद्र्याच्या परिघातून नखाळीची निर्मिती झाली -डॉ. रणधीर शिंदे 

July 19, 2026
महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

July 19, 2026

आज बार्शीतील सर्व वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरु राहणार

July 19, 2026

अल्पवयीन शाळकरी मुलींना रोडरोमी आणि अनावश्यक त्रास होत असल्याची गंभीर समस्या

July 19, 2026

मोदींनी फोन वरून केले शास्त्रज्ञाचे अभिनंदन #viral

July 19, 2026

माळशिरस नातेपुते मध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 19, 2026

श्रावणीच्या तुफानाचे नेटकरी करतायत कौतुक

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0986518

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!