मंगळवेढा – “माझ्या प्रेयसीला फोनवरून काय बोलली? मी तिचा नाद सोडणार नाही,” असे म्हणत उसाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास घडली. या मारहाणीत २२ वर्षीय विवाहिता गंभीर जखमी झाली. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी जखमी विवाहितेचा पती सागर शिवाजी देवकते (रा. रड्डे) यांच्यावर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास
जखमी झालेल्या विवाहितेचे नाव सोनाली सागर देवकते (वय २२) असे आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोनाली आपल्या घरासमोर काम करत होत्या. त्यावेळी पती सागर देवकते याने “तू रूपालीला फोनवरून काय बोलली? मी तिचा नाद सोडणार नाही. तुला काय करायचे ते कर,” असे म्हणत उसाने बेदम मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी सागर शिवाजी देवकते यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (भादंवि) संबंधित कलमांनुसार गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार शिंदे करत आहेत.
Post Views: 9