सोलापूर : 21 जून 2026 संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सतगुरु बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ “मानव एकता दिना”निमित्त सतगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन अंत्रोळीकर नगर भाग 1, कुमठा नाका या ठिकाणी सकाळी 9.00 ते दुपारी 5.00 या वेळेत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 102 श्रद्धाळूंनी रक्तदान करून सतगुरूंचा आशीर्वाद प्राप्त केला.
या शिबिरास उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, छ. शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल व डॉ. वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेज सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड बँक चेअरमन डॉ. राजीव प्रधान, आणि नगरसेविका सौ. संगीता शिवाजी जाधव व सौ. संगीता शंकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित साऱ्याच गणमान्यांनी मिशनच्या वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, नैसर्गिक आपत्तीत मदत व पुनर्वसन, रक्तदान शिबिर या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरवातीस सोलापूर क्षेत्रीय प्रभारी श्री. इंद्रपाल सिंह नागपालजी म्हणाले की, बाबा हरदेवसिंहजी यांनी स्वतः रक्तदान करून 1986 पासून सुरू केलेल्या या रक्तदानाच्या अभियानामध्ये 2026 पर्यंत जगभरात 15,00,230 युनिट इतके रक्तदान करून भाविक-भक्तांनी योगदान दिले आहे. सोलापूर क्षेत्रामध्ये जवळ जवळ 25 ठिकाणी पूर्ण वर्षभर ही रक्तदानाची शृंखला अशीच अविरत सुरू राहील. निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी अध्यात्मप्रती मानव मात्राला जागृत करण्यासाठी व सामाजिक उत्कर्ष घडवून आणण्यासाठी अथक कार्य केले. संपूर्ण भारतासह अनेक देशांमध्ये निरंकारी मिशनचा प्रचार केला. तेच कार्य आज वर्तमान सतगुरु माता सुदिक्षाजी महाराज पुढे घेऊन जात आहेत.
या शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी श्रीमती गोपाबाई दमाणी व सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढीच्या सर्व स्टाफचे तथा निरंकारी सेवादलचे सहकार्य लाभले.रक्तदानाबरोबरच सत्संगाचा कार्यक्रम पार पडला ,ज्यात उपस्थित भाविक भक्तांनी तत्कालीन सतगुरू बाबा गुरबचनसिंहजी यांच्या जीवनावर आधारित गीत आणि विचारद्वारे श्रद्धा सुमने अर्पण केली.
Post Views: 9