माढा : माढा जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची केंद्र शाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सकाळी ७ वाजता विद्यार्थिनींनी विविध योगासने व प्राणायामांचे प्रभावी सादरीकरण करून योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
कार्यक्रमात योगगुरू लोंढे व प्रवीण भांगे यांनी योगासने व प्राणायामाचे महत्त्व सांगत सुर्य नमस्कार,वृक्षासन, ताडासन, मकरासन, धनुरासन, गोमुखासन, तसेच विविध प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थिनींनीही अतिशय उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत योगासने सादर केली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश माळी , शिक्षक विनोद परिचारक,चारुदत्त आष्टेकर, प्रशांत होवाळ,दत्तात्रय घुमरे तसेच शिक्षिका लोखंडे उबाळे ,नूतन कानडे व स्वाती घावटे उपस्थित होत्या.उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थिनींना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनासाठी योग आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थिनींनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग, योगगुरूंचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.