पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने चांदापुरी परीसरातील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 13 सायकलीचे सद्गुरू साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले ,भगवान सुळ, समीर पठाण, नईम पठाण, संतोष कोपनर, मुख्याध्यापक शिवाजी मारकड सर, भिमराव ढेरे, दादा सरतापे, पतसंस्थेचे सचिव प्रदीप मदने ,पतसंस्थेचे संचालक, सर्व पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी ,परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतापसिंह विदयालय चांदापुरी या विद्यालयातील 10 विद्यार्थ्यांना तर सदाशिव देठे विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले .चांदापुरी पतसंस्थेमार्फत गेल्या 20 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात तसेच गोरगरीब, सर्व सामान्य, गरजू विद्यार्थ्यांना गेल्या विस वर्षांपासून मदत केली जाते .हा सामाजिक उपक्रम पतसंस्थेमार्फत याही वर्षी चेअरमन भजनदास चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला .या पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले हे या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच मदतीचा हात देतात.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















