बार्शी – तालुक्यातील धोत्रे येथे अवैध हातभट्टी दारु विक्री विरोधात बार्शी तालुका पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत अठराशे रुपयांचा एकूण १८ लिटर हातभट्टी दारु जप्त केला आहे. याप्रकरणी एका पुरुषासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धोत्रे येथील पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूस कमल संजय काळे (वय ३०, रा. धोत्रे) याच्याकडे ९ लिटर हातभट्टी दारु आढळून आली. तिची अंदाजे किंमत ९०० रुपये आहे. ही दारु विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत त्याच दिवशी सुमारास त्याच परिसरात वंदना अमोल काळे (वय ३२, रा. धोत्रे) यांच्याकडे ९ लिटर हातभट्टी दारु आढळून आली. तिची किंमतही अंदाजे ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 7