बार्शी – बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथे ६० वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सूर्यभान बाबुराव मंडलिक (वय ६०, रा. कासारवाडी) हे ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत त्यांचे नातेवाईक प्रमोद अंकुश मंडलिक (वय ३०) यांनी बार्शी तालुका पोलिसांना खबर दिली.
Post Views: 7