बार्शी – राजमाता आहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय व सकल धनगर समाज, बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती उत्सव व समाजातील कर्तुत्ववान व्यक्तीमत्वांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कार सोहळा माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना राजाभाऊ राऊत म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी म्हणजे न्याय, कर्तव्य आणि सेवाभावाचा आदर्श. त्यांनी राज्य सांभाळून काशी ते रामेश्वर घाट, विहिरी, मंदिरं बांधली. बार्शीच्या वाचनालयाने आणि सकल धनगर समाजाने कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार ठेवून खऱ्या अर्थाने राजमातांना श्रद्धांजली दिली. आपल्या समाजातील मुले-मुली शिक्षणात, प्रशासनात, खेळात पुढे जातील तेव्हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या कार्यक्रमात समाजातील जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, डॉ. नवनाथ कसपटे, रणजित महानवर, अनिल बनसोडे, प्रशांत पैकेकर, अर्चना बजरंग नरुटे, संतोष कोयले, नरुटे, ॲड.पवन वायकुळे, मधुकर वैद्य, नाना सातपुते, आनंद सातपुते, समृद्धी समीर वायकुळे, रामेश्वर पाटील, डॉ. योगेश नरुटे आदी मान्यवर यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. उपस्थितांना राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करुन त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाला नानादेव फरांडे महाराज, सौ.तेजस्विनीताई कथले, विजय गरड, सौ. मीनाक्षीताई रोंगे, श्रीमंत थोरात, सचिन वायकुळे, रोहित पाटील, समीर मदनराव वायकुळे, ॲड.रविंद्र वैद्य, अमोल सुभाष वायकुळे, बजरंग नरुटे, ॲड. प्रशांत एडके, शितल पाटील, शशिकांत वायकुळे, आप्पा शेंडगे, राहुल भौरे, आमाराम वायकुळे, अजय वायकुळे,
गणेश वायकुळे, राहूल शेंडगे, अक्षय खरात, ज्ञानेश्वर वायकुळे, विक्रम टकले, कालिदास देवकते, आप्पासाहेब हांडे, सुरेश होनमाने, स्वप्रिल वायकुळे, सागर वायकुळे, सौरभ देवकते, बबन गडदे, सुर्यकांत चोरमुले, प्रविण कसपटे, भास्कर करडे, दिपक खरात, विपुल शेंडगे, नितिन कोळेकर, विपुल होनमाने, विशाल वायकुळे, राजाभाऊ पांढरमिसे, प्रमोद वाघमोडे, नाना धायगुडे, अरुण येळे, माणिक हजारे, राजाभाऊ पैकेकर, दिलीप वायकुळे, सचिन शेंडगे, ऋषीकेश वायकुळे, शिवाजी हाके, राहुल खरात, सौरभ वायकुळे ,बिरमल सातपुते, रोहित वायकुळे, तानाजी वाघमोडे, मदन वाघमोडे तसेच बार्शी शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता आहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय व सकल धनगर समाज, बार्शी शहर व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 8