पंढरपूर – पंढरपूर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शना नंतर वारकरी भक्तांना पाहण्या सारखी पंढरपूरच्या आसपास अनेक छोटीमोठी देवालयांची ठिकाणे आहेत. या पैकी पखालपूरचे गणपती मंदिर देखील पुरातन असून तो परिसर देखील विकसीत केला तर तिथे देखील दर्शनासाठी आणि विकसित केलेला परिसराला भेट देण्यासाठी भक्तांची गर्दी होवू शकते. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरात काँरिडोरची निर्मिती करीत असताना येथे येणारा वारकरी भाविक पंढरपूरात एक, दोन दिवस राहून या पंढरपूर परिसरातील अशा छोट्या मोठ्या देवलायाच्या ठिकाणी भेट देवू शकतील अशा पध्दतीने या देवलयांच्या ठिकाणचा पध्दतशीरपणे विकास करुन ती ठिकाणे देखील धार्मिक पर्यटन क्षेत्रे म्हणून भाविकभक्तांसाठी आकर्षण केंद्रे ठरतील अशा पध्दतीने विकसित करावीत अशी मागणी शहरातील नागरिकांतून केली जात आहे.
——————–
चौकट : ( सव्वातीनशे वर्षापूर्वीचे हे पुरातन देवालय )
पंढरपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पखालपूरचा गणपती हे तसे खूप जुने देवस्थान. सुमारे ३२७ वर्षापूर्वी हे देवालय स्थापन झाले. पण गेल्या २५ – ३० वर्षात हे देवालय खूप प्रसिध्दीस आले. इतके की आता दर संकष्टी चतुर्थीस एसटी बसेसची भाविकांना नेण्या आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाली आहे. सोलापूर – करकंब हा जो रस्ता आहे त्यावरील रेल्वेगेटच्या पश्चिमेचा रस्ता एसटी बसेस सुरु झाल्यावर पखालपूरचे देवळापर्यंत चांगला झाला आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिरापासून एक, दोन मैलावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधलेला दगडी बारव आहे. आता तोही पडक्या अवस्थेत आहे.
———————-
चौकट : ( डिंगरे घराण्याचे कुलदैवत )
पंढरपूरचे पांडुरंग भानुदास डिंगरे हे गणपतीचे भक्त. त्यांचे कुलदैवतच गजानन. २५-३० वर्षापूर्वी पर्यंत फक्त डिंगरे घराण्यातील कोणी पुर्वाजाने गजानाने देऊळ बांधुन आसरा केला. त्याचीही पुढे पडझड झाली. पण अलिकडच्या काळात तात्या डिंगरे, शिंदे, परिचारक वगैरेंच्या सहकार्याने लोकांकडून जमलेल्या वर्गणीवर मंदिर पुन: जसे होते तसेच उभारले आहे. नवे मंदिर ४० बाय २० मापाचे आहे. पुर्व बाजूस दगडी कठडा आहे तर पश्चिम, उत्तर व दक्षिण बाजूस संपुर्ण भिंत आहे. पुर्व बाजूला या आवाराच्या पुढे मंदिरात गणपतीची शेंदूर चर्चित मुर्ती आहे. गाभाऱ्यात दक्षिण बाजुला शिवलिंग आहे. मंदिराच्या परिसराभोवती प्रदक्षिणेसाठी स्वच्छ पटांगण आहे.
———————–
चौकट : ( चतुर्थी, गणेशजयंतीला होते गर्दी )
पखालपूर येथील गणपती मंदिराचे उत्तर बाजूस इशान्य दिशेला नवीनच हातपंप बसविलेला आहे. येवढ्या खडकाळ माळावर पाणी लागलेले आहे. त्यापूर्वी येथे अजिबात पाणी नव्हते. दर संकष्टी चतुर्थीस, गणेश चतुर्थी, व गणेश जयंती दिवशी अक्षरश: हजारो लोक येथे दर्शनासाठी येत असतात. या दिवशी पखालपूरला जत्रेचे स्वरुप येते.
————————
Post Views: 7