बार्शी – रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या लिग -२ नवरात्र चषक राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी (संचलित) विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ८ खेळाडूंनी उत्कृष्ट संपादन करून पुढील होणाऱ्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
विजयी खेळाडू पुढील प्रमाणे- राजनंदिनी जाधवर – गोल्ड मेडल, माही पवार – गोल्ड मेडल, आरोही काकडे – गोल्ड मेडल, .अथर्व भूजबळ – गोल्ड मेडल, लावण्या मुद्दे- गोल्ड मेडल, व्यंकटेश शेटे – गोल्ड मेडल, प्रथमेश पवार- गोल्ड मेडल, कबिर भालेराव – सिल्वर मेडल
वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष/प्रशिक्षक- . गणेश रोडे , सचिव – सौ.सविता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच संस्थेच्या वतीने .अतुल जाधव , सौ.स्नेहल रोडे , कु.संचिती जाधव,.रितेश जानराव , विश्वजीत जाधव आदित्य माळी,यश नान्नजकर, पृथ्वीराज रोडे , यशराज रोडे,या सर्व प्रशिक्षकांनी व सर्व पालकांनी या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
Post Views: 14