Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जाफराबाद तालुक्यात निवडणुकीचे वाजले बिगुल: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर

राजकीय पक्ष आणि विशिष्ट लोकांच्या चांगभल्यासाठी प्रशासनाने गट रचना केल्याचे स्पष्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 16, 2025
in marathwada, political, solapur
0
जाफराबाद तालुक्यात निवडणुकीचे वाजले बिगुल: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/टेंभुर्णी :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचने संदर्भातील आदेश तहसीलदारांनी सादर केलेल्या गट रचनेच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले असून जाफराबाद तालुक्यात करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याचे दिसत आहे.

जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना ही प्रशासनाने काही राजकीय पक्ष आणि काही विशिष्ट लोकांच्या चांगभल्यासाठी करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. यापूर्वी टेंभुर्णी गटात समाविष्ट असणारी गावे सिपोरा अंभोरा गटात समाविष्ट करण्यात आली असून सिपोरा अंभोरा गटात समाविष्ट असणारी गावे राजकीय फायद्यासाठी टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आल्याचे दिसत आहे.

जाहीर करण्यात आलेले प्रभागरचने नुसार टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात टेंभुर्णी हा एक गण आणि काळेगाव असे दोन गण असतील. टेंभुर्णी गणात टेंभुर्णी आणि गणेशपुर तर काळेगाव गणात काळेगाव, भातोडी,खानापूर, शिराळा, डोलखेडा, नांदखेडा, काचनेरा,किन्ही, वाढोणा,वरखेडा फिरंगी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. सदर गट रचना करताना प्रशासनाने नेमका कोणता निकष लावला हे न उलगडणारे कोडे आहे.आपल्या विचारांची असणारी गावे सिपोरा गटातून काढून राजकीय फायद्यासाठी टेंभुर्णी गटात समाविष्ट करण्यात आली आहेत.सिपोरा अंभोरा गटामध्ये सिपोरा आणि सावरगाव म्हस्के हे दोन गण असतील. सिपोरा गणात देऊळझरी, ब्रह्मपुरी, मंगरूळ, हनुमंतखेडा, आळंद, हिवरा काबली या गावांचा समावेश आहे तर सावरगाव मस्के या गणामध्ये सावरगाव, कुंभारझरी, गोंधनखेडा, सावंगी, डावरगाव, टाकळी, गारखेडा,निमखेडा आणि नळविहीरा या गावांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे पूर्णा नदीच्या पलीकडील असलेल्या टाकळी गारखेडा डावरगाव या गावांचा सिपोरा गटात समावेश करताना नेमका कोणता साक्षात्कार प्रशासनाला झाला हे ही न उघडलेलं कोडे आहे. अकोला देवगटामध्ये अकोला देव आणि डोणगाव हे दोन गण असतील अकोला देव गणात अकोला देवसह दहिगाव, तपोवन गोंधन,आंबेगाव, तोंडोळी या गावांचा समावेश आहे. डोणगाव गणात डोणगाव सह पोखरी, बुटखेडा, सातेफळ, निवडुंगा या गावांचा समावेश आहे.माहोरा जिल्हा परिषद गटात माहोरा आणि खासगाव हे दोन गण असतील खासगाव गणात खासगाव सह जानेफळ पंडित कुंभारी खापरखेडा, बोरगाव बुद्रुक,सवासनी मेरखेडा ही गावे तर माहोरा गणात माहोरासह बेलोरा, चापनेर धोंडखेडा,कोल्हापूर, भोरखेडा या गावांचा समावेश राहील. वरूड बुद्रुक गटात वरुड बुद्रुक आणि भारज खुर्द हे दोन गण असतील.

वरूड गणामध्ये वरुड सह कोळेगाव, सोनगिरी, सांजोळ, भराडखेडा , कोनड, बुद्रुक,सोनखेडा, सावरखेडा गोंधन तर भारज खुर्द गणात भारज खुर्द,आढा,पासोडी, शिंदी, वानखेडा या गावांचा समावेश आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जवखेडा ठेंग गणामध्ये जवखेडा ठेंग आणि चिंचखेडा असे दोन गण असतील जवखेडा गणात जवखेडा ठेंग,बोरखेडी गायकी, म्हसरूळ, आसई, वरूड खुर्द पिंपळगाव कड, घाणखेडा तर चिंचखेडा गणात चिंचखेड्यासह हिवराबळी आरतखेडा, गोकुळवाडी, हरपाळा, देऊळगाव देवी, पिंपळखुटा, वरखेडा विरो, रेपाळा सावरखेडा, विरखेडा भालकी या गावांचा समावेश आहे.

वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ : कळंबे

जाफराबाद तालुक्यातील गट आणि गणांची रचना करताना प्रशासनाने पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून सदर गट रचना केलेली आहे. गेल्या 30 वर्षात कधीही करण्यात आलेली नव्हती अशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती चा विचार न करता गट रचना करण्यात आली आहे. विशेषता टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात गत पंचवीस वर्षात समाविष्ट नसणारी गावे राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्व गट रचनेवर सर्व पुराव्यांशी आक्षेप नोंदवणार असून प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल आणि सत्तेचा वापर करून रडीचा डाव खेळणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी सांगितले

Post Views: 36
Tags: electionsolapur latestsolapur latest newssolapur tarun bharat solpaur tarun bharatsolpaur tarun bharatsolpaur tarunbharattarun bharat latest newstarun bharat marathitarun bharat solapur
Previous Post

स्व.ॲड. भाऊसाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आटीबीपी मध्ये निवड

Next Post

१० हजार पदांची पोलीस भरती ऑक्टोबर पासून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर होताच मैदानावर गर्दी!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
१० हजार पदांची पोलीस भरती ऑक्टोबर पासून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर होताच मैदानावर गर्दी!

१० हजार पदांची पोलीस भरती ऑक्टोबर पासून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर होताच मैदानावर गर्दी!

ताज्या बातम्या

रमजान व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्या – एमआयएमची मागणी #marathinews #ramdanmubarak

February 27, 2026

अरे वा @ एसटी स्टँडवर बसवले ७१ सीसीटीव्ही कॅमेरे.#busstand #mh13newssolapur #cctv #security #viral

February 27, 2026

सिद्धेश्वर तलाव ; ऑक्सिजन कमी झाल्यामुळेच मरतात कासव, मासे. #public #siddheshwartemple #saveanimals

February 27, 2026

बार्शीचा अर्थसंकल्प आज होणार जाहीर..#barshikar #barshinews #viral #public

February 27, 2026

शेतकऱ्यांनो लवकर किसान KYC करा #kyc #modiji #yojna #viral #public #farmers #developer

February 27, 2026

पंढरपूर कॉरिडॉर विरोधात पंढरपूर बंद.. #pandhrpur #corridor #project #viral #public

February 27, 2026

४५ दिव्यांग शाळांची झाली तपासणी #public #handicapped #school

February 27, 2026

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी नकोच ; पालकास दहा हजार रुपये दंड.#public #traffic #trafficpolice

February 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0707848

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697