सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे १० वर्षे नेतृत्व केलेले आणि महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफी संघाचे नेट गोलंदाज योगेश कोम्पल हे बीसीसीआयच्या लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
साऊथ सोलापूरचे कोम्पल यांना ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अशोक टिळक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रिकेट क्षेत्रातील तब्बल १५ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेल्या कोम्पल यांनी यापूर्वी ‘कोचिंग बियाँड लेव्हल १’ तसेच ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे सिल्व्हर अक्रिडेशन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सध्या ते ‘विहान क्रिकेट अकॅडमी’चे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या अकॅडमीमध्ये सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. बीसीसीआयचे अधिकृत प्रशिक्षकपद मिळाल्याबद्दल सोलापूरच्या क्रीडा जगतातून त्यांचे कौतुक होत आहे.
——




















