सोलापूर – नांदेड येथे झालेल्या 19 वर्षाखालील शालेय राज्य बुद्धिबळ स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजच्या मानस सुमुख गायकवाड याने रौप्य पदक पटकाविले. त्यास शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते, प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याबद्दल त्याचा सत्कार प्र. प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केला. यावेळी त्याच्या आई सारिका गायकवाड उपस्थित होत्या.
त्याचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी , शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले.
—–





















