Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बदलत्या वारीचे स्वरूप,आत्मीयता,जिव्हाळा तर वारी समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवेच : सूर्यकांत भिसे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 27, 2025
in maharashtra, political, social, solapur, top news
0
बदलत्या वारीचे स्वरूप,आत्मीयता,जिव्हाळा तर वारी समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवेच : सूर्यकांत भिसे
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली आषाढी वारी आता झपाट्याने बदलत असली, तरी त्यातील आत्मियता आणि जिव्हाळ्याचा भाव कायम असल्याचे मत पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केले. वारीचे वार्तांकन प्रभावीपणे करण्यासाठी आणि ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात विश्व संवाद केंद्राने आयोजित केलेल्या ‘पत्रकार वारकरी’ या मुक्त संवादात सूर्यकांत भिसे बोलत होते. शुक्रवार पेठेतील भारत भवन येथे झालेल्या या संवादात पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे, सदस्य पावलस मुगुट्मल, छायाचित्रकार मनोज मांढरे, सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेट्ये आणि विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते. पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींसाठी हा संवाद आयोजित करण्यात आला होता.
गेली ३५ वर्षे वारीचे वार्तांकन करणारे सूर्यकांत भिसे यांनी सांगितले की,”एक तरी वारी प्रत्येकाने अनुभवायला हवी. वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालत, भजन करत वारी केली तरच चांगली बातमी करता येते. त्यातून आत्मीय भाव बातमीत उतरतो. आजच्या पिढीला जीवन समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी पायी वारी नक्की अनुभवावी.” वारी खऱ्या अर्थाने कायिक, वाचिक आणि मानसिक तप आहे, जी वारकऱ्याला कृषी पर्यटन आणि सामाजिक मानसशास्त्राचाही अभ्यास करायला लावून सर्वांगाने समृद्ध करते, असेही ते म्हणाले. वारीतील व्यवस्थापन, आर्थिक बाजू आणि परंपरा याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे यांनी ‘ई-वारी’मुळे आषाढी वारी जगभरातील मराठी जनांपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. टेमघरे म्हणाले, “इंटरनेटमुळे वारीचे वार्तांकन जागतिक झाले आहे. आषाढी वारी हा ऊर्जेचा प्रवाह असून, समाजमाध्यमांतून तो सकारात्मकच जायला हवा.” वारीतील अयोग्य बाबींबद्दल वार्तांकन करतानाही भाषा आणि सत्यता पडताळणीचे महत्त्वही टेमघरे यांनी अधोरेखित केले. नव्या पिढीने महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा अभ्यासायला हवा, कारण धकाधकीच्या जीवनात नागरिक पुन्हा अध्यात्माकडे वळत असून, वार्तांकनात आध्यात्मिक ‘बीट’ तयार होत असल्याचेही ते म्हणाले.
ॲड विलास काटे म्हणाले, “वारी म्हणजे श्रद्धा, त्याग, समर्पण, निष्ठेची अनुभूती आहे. संतांचे चरित्र व्यापक असून त्यांच्या साहित्यात अध्यात्मासोबत विज्ञानही आहे. हीच सकारात्मकता घेऊन वारी जगभरात पोहोचायला हवी आणि जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या संतांचे चरित्र अभ्यासक्रमात असायला हवे.”
पावलस मुगुट्मल यांनी वारकऱ्यांचे व्यवस्थापन अलौकिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “प्रत्येक दिंडीचे स्वतंत्र व्यवस्थापन असते. तसेच पालखी आणि संपूर्ण सोहळ्याचेही व्यवस्थापन स्वतंत्र असते. एक प्रकारे ८ ते १२ लाख वारकऱ्यांचे शहर रोज पायी चालत असते. यावेळी सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे यांनी वारीची माहिती दिली. विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांनी प्रास्ताविक केले. नितीन देशपांडे यांनी वारकरी पत्रकारांचा सत्कार केला.
आषाढी वारी समजून घेण्यासाठी प्रशिक्षण : 
वार्तांकनाबरोबरच वारी समजून घेण्यासाठी पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. आषाढी वारीपूर्वी दोन महिने आधी हा प्रशिक्षण कार्यक्रम होईल, अशी माहिती संघाने दिली. वारीतील परंपरा, नियम, वार्तांकनाचे कंगोरे, तंत्र आणि समन्वयाचा यात अभ्यास असेल.
Post Views: 37
Previous Post

भीषण अपघात! कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलरने २ दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Next Post

महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतमालाची यशस्वी निर्यात : कुलदीप जंगम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतमालाची यशस्वी निर्यात : कुलदीप जंगम

महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून शेतमालाची यशस्वी निर्यात : कुलदीप जंगम

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909186

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697