करमाळा – करमाळा मतदार संघातील गावांना तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी मंत्री अतुल सावे यांचेकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत करमाळा मतदार संघातील गावामधील तांडा वस्ती योजनेत प्राबल्य असलेल्या समाज घटकाच्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यांना अद्यापपर्यंत विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये, समाज मंदिर, वाचनालये व मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची उक्त सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे समितीमार्फत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव उपसचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आलेला असल्याने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून खालील गावांतील पायाभूत सुविधांच्या विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचेकडे केली आहे.
यानुसार मौजे कुगाव ता. करमाळा मारकड वस्ती रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), मौजे शेलगाव (वां) ता. करमाळा केकाण पठाड वस्ती रस्ता खडीकरण करणे (10 लक्ष), मौजे शेलगाव (वां) ता. करमाळा ठोंबरे वस्ती कुकाई रस्ता खडीकरण करणे (05 लक्ष), मौजे सोगाव (पु) ता. करमाळा विश्वकर्मा नगर कॉंक्रीट रस्ता करणे (10 लक्ष), मौजे केत्तूर 1 ता. करमाळा कानगुडे वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे व सौर दिवे बसविणे (10 लक्ष), मौजे केतूर नं, २ येथील वस्ती मध्ये कॉंक्रीट रस्ता करणे व सौर दिवे बसविणे (10 लक्ष), मौजे घारगाव ता. करमाळा सुरवसे वस्ती येथे विद्युतीकरण करणे (15 लक्ष), मौजे केम ता. करमाळा शिवराम बुवा गल्ली येथे बंदिस्त गटार व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (15 लक्ष), मौजे टाकळी ता. करमाळा वार्ड क्र. 1 येथे कॉंक्रीट रस्ता करणे (20 लक्ष), मौजे केम ता. करमाळा पळसकर वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे (10 लक्ष), मौजे कामोणे ता. करमाळा देमुंडे वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10 लक्ष), मौजे पोंधवडी ता. करमाळा हुलगे वस्ती येथे रस्ता करणे (10 लक्ष), मौजे कुर्डू ता. माढा धनगर वस्ती येथे कॉंक्रीट रस्ता करणे (25 लक्ष), मौजे कव्हे ता. माढा हिरोजी इंदोलकर वस्ती भूमिगत गटार रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे (15 लक्ष), मौजे म्हैसगाव ता. माढा सरवदे वस्ती कॉंक्रीट रस्ता करणे (15 लक्ष), मौजे भोसरे ता. माढा मदने वस्ती येथील रस्ता कॉंक्रीट करणे (10 लक्ष), मौजे लोणी – नाडी ता. माढा येथील रामोशी गल्ली येथे रस्ता कॉंक्रीट करणे (10 लक्ष) या कामांचा समावेश आहे.
यामुळे सदर कामांसाठी निधी मिळावा म्हणुन आपण मागणी केल्याचे आमदार नारायण आबा पाटील दिली. तर तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत उर्वरित गावानाही निधी मिळावा म्हणुन आमदार नारायण आबा पाटील सुचनेनुसार पुरवणी यादी तयार करण्यात येत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.
























