Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सन 2017 च्या तुलनेत यंदाच्या मतदार संख्येत 2 लाख 51 हजारांची वाढ

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आज  प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. 5 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. सन 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 6 लाख 73 हजार मतदार होते. यंदाच्या 2025 च्या निवडणुकीसाठी मतदार संख्येत 2 लाख 51 हजार मतदारांची वाढ झाली आहे. यंदा प्रारूप मतदार यादी मध्ये एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार असल्याचे दिसून येते. 

             महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता  राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम केले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार एकूण 26 प्रभागांकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, सन 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 6 लाख 73 हजार मतदार होते. यंदाच्या 2025 च्या निवडणुकी करिता मतदार मतदार संख्येत नैसर्गिक वाढ झाली आहे. 2 लाख 51 हजार  मतदारांची वाढ यंदा झाली आहे. यंदा प्रारूप मतदार यादी मध्ये एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार असल्याचे  स्पष्ट झाले आहे.

        हरकती / सूचना निवडणूक मुख्य कार्यालय, डॉ. कोटणीस हॉल, आयसीआयसीआय बँकेच्यावर, सोलापूर या ठिकाणी स्वीकारण्यात येतील.

हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 27 नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या निवडणूक मुख्य कार्यालय, डॉ कोटणीस हॉल, आयसीआयसीआय बँकेच्यावर या ठिकाणी नागरिकांना विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहेत. मतदार यादीची प्रतिपृष्ठास दोन रूपये दराने विक्री करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागाचे मतदारयादीचे फोटो नसलेले मतदारयादी सीडी, पेन ड्राईव्ह मध्ये 100 रुपये दराने उपलब्ध करण्यात येत आहे.

          प्रारूप मतदारयादीची प्रसिध्दी महानगरपालिका मुख्य कार्यालयाचे सूचना फलक, विभागीय कार्यालय क्र. 1 ते 8  येथील सूचना फलक, स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक टिव्हीवर करण्यात येणार आहे. ही यादी सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे.याशिवाय ही यादी महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

     दरम्यान महापालिका कौशल अहवाल येथे लावण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या पाहण्यासाठी नागरिक राजकीय कार्यकर्ते नेते यांची गर्दी झाल्याचे दिसून आले तर निवडणूक कार्यालयात मतदार यादी खरेदी करण्यासाठी नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांची वर्दळ होती.

5 डिसेंबरला होणार अंतिम मतदारयादी जाहीर 

 प्रारूप मतदार यादीवरून दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रामाणित करून 5 डिसेंबर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 8 डिसेंबर आहे तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 12 डिसेंबर ही आहे.  राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदारयादीबाबत जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार  महापालिका स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. 

  प्रभाग क्रमांक 20 मध्ये  सर्वाधिक मतदार संख्या

प्रारूप मतदार यादी नुसार सर्वाधिक मतदार संख्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये असून येथे 45 हजार 581 मतदार आहेत. त्या खालोखाल प्रभाग 8 मध्ये 42 हजार 714 , प्रभाग 12 मध्ये 40,637 तर प्रभाग 23 मध्ये 40,418 मतदार संख्या असल्याचे दिसून येते.एकूण 26 प्रभागांमध्ये मिळून एकूण पुरुष मतदार संख्या चार लाख 57 हजार 99 इतकी आहे स्त्री मतदार संख्या एकूण चार लाख 67 हजार 471 आहे इतर मतदार संख्या 136 आहे असे एकूण महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार संख्या 9 लाख 24 हजार 706 इतकी आहे.

Post Views: 92
Previous Post

महिलांच्या वतीने टाळाच्या नादात हरी नामाचा जप

Next Post

सुधार योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी – नारायण पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सुधार योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी – नारायण पाटील

ताज्या बातम्या

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

September 10, 2026

सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन!

September 10, 2026
पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

September 10, 2026

समायोजन रखडले ; वेतनही थांबले

September 10, 2026
अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1189461

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!