देगलूर / नांदेड : देगलूर येथील गजानन महाराज आणि दत्त मंदिर संस्थान यांच्याकडून नवनियुक्त नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे तसेच नगरसेवक आणि नगरसेविका यांचे सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
दरम्यान या मंदिरात पुजा अर्चा आणि आरती करण्यात आली. सर्व भाविक भक्ताच्या उपस्थित नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक, नगरसेवक प्रतिनिधी यांचे मंदिर संस्थान यांच्याकडून सत्कार करण्यात आले. यामध्ये नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजी टेकाळे, नगरसेविका पदमवार उज्वला लक्ष्मीकांत, नगरसेवक शाखावार नंदकिशोर लक्ष्मण, टेकाळे (बबलू) एकनाथ शेषराव, नगरसेविका कडलवार शोभा दिगंबरराव, मैलागिरे रोहिणी बालाजी, तोटावर योगेश्वरी लक्ष्मण, कौरवार रत्नमाला रमेशराव, कांबळे मीनाक्षी व्यंकट, मोरे कलावती माधवराव, नगरसेवक दयाडे पल्लवी रुपेश, इतापे प्रेमला दत्तात्रेय, बोन्लावार अनिल गंगाराम, तसेच संजय जोशी, नाना मोरे, बालाजी मैलागिरे, व्यंकट कांबळे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंदिर संस्थान अध्यक्ष रमेश कंतेवार, सचिव दिनेश मुनगीलवार, सायलू तैदलवार, शंकर अप्पा मठपती, अशोक पैनसलवार, प्रमुख विश्वस्त नारायण तोटावार, जेष्ठ पत्रकार अविनाश देसाई हसनाळकर आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
















