बार्शी – तालुक्यातील अलीपूर येथील राहत्या घरातून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली. पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पतीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रामेश्वर हनुमंत जाधव (वय २७, रा. अलीपूर, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ११ सप्टेंबर २६ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रामेश्वर जाधव यांची पत्नी जयश्री या अलीपूर येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी प्रकरणाची नोंद करुन बेपत्ता महिलेचा शोध सुरु केला आहे. तसेच अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल निचळ करीत आहेत. बेपत्ता महिलेबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तातडीने बार्शी तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Post Views: 8