बार्शी – तालुक्यातील कोरफळे गावात एका महिलेने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मयत प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
मयताचे नाव लक्ष्मी विलास सुपेकर (वय ३५, धंदा घरकाम) असून ती कोरफळे, ता. बार्शी येथे राहत होती. तिच्या पती विलास दत्तात्रय सुपेकर (वय ४२, ) यांनी पोलिसांकडे खबर दिली.
घटनेनुसार, लक्ष्मीने १२ सप्टेंबर २६ रोजी रात्री ११ वाजल्यानंतर ते १३ सप्टेंबर पहाटे ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत घरातील खोलीत लोखंडी पाईपला नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कारण अज्ञात असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अंतर्गत अ.म.नं. ६९/२०२६ नोंदविण्यात आली आहे. असून पुढील तपास सुरु आहे.
Post Views: 11