Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in west maharashtra
0
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


आटपाडी –           सर्वसंपन्न, परिपूर्ण भारत घडावा म्हणून आटपाडी तालुक्यातील सर्व ज्येष्ठांनी, देशाला – राज्याला योग्य दिशा देण्यासाठी पुढे यावे, एकवटावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले .
अर्थक्रांती जीवन गौरव ज्येष्ट नागरीक संघटनेच्या वतीने पत्रकार, गुणवंतांचा आणि सत्कार व नवीन सभासदांचे स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी सादिक खाटीक बोलत होते .
पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल प्रा . अभयसिंह विठ्ठलराव उर्फ पोपटराव देशमुख, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक, संपादक लक्ष्मण खटके, पत्रकार प्रशांत देशमुखे, पत्रकार सुधिर पाटील, पत्रकार सुरेश मोकाशी यांचा यावेळी सत्कार करणेत आला .
प्रत्येक भारतीय हे देशाचे मालक, विश्वस्त, राजे आहेत, याचा विसर पडल्यानेच कोट्यावधी भारतीयांना आज अनंत अडचणी, संकटे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी, देशाच्या सर्व धर्मिय धार्मिक व्यवस्थांमध्ये भारतीय बजेट च्या १८ पट पैसा जमत असल्याचे सांगीतले जाते . कोट्यावधी देवभोळ्या सर्वसामान्यांच्या खिशातून धार्मिक स्थळी गोळा होणाऱ्या पैशापैकी बराचसा पैसा शासनाने ताब्यात घेतल्यास देशाचा सर्वांगीम व चौफेर विकास प्रतिवर्षी १८ पटीने साधला जाईल . त्यामुळे प्रत्येक देशवाशीय सुखी संपन्न आणि समृद्ध बनेल असे मत ही त्यांनी मांडले .
राजकीय व्यवस्थेने बहुसंख्य भारतीयाचे कसे दशावतार केले . आणि आपण मालक असल्याचा विसर प्रत्येकाला कसा पडला . याची उदाहरणे देऊन सादिक खाटीक यांनी, शासकीय व्यवस्थेतून ज्येष्टांच्या आटपाडी शहरातील ज्येष्ट नागरीक भवनासाठी १० गुंठा जागा उपलब्ध करून दिल्यास आपण आमदार खासदार महोदयांच्या माध्यमातून यासाठी २ कोटी रुपयाचा निधी आणण्यात यशस्वी होवू. असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील यांनी आटपाडीतील ज्येष्टांना दिलेली सन्मानजनक वागणूक व प्रलंबीत विधेयकासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या आश्वासना बाबत सादिक खाटीक यांनी आटपाडी तालुक्यातील ज्येष्ट नागरीकांच्या वतीने आमदार जयंतराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली .
प्रारंभी स्वागत, स्वरूप व प्रास्ताविक करताना ज्येष्टांचे नेते अरविंद चांडवले यांनी, ज्येष्टांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाने तातडीने निर्णय करावा . अशी अपेक्षा व्यक्त केली .
ज्येष्टांच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष व्ही . एन . देशमुख सर आणि जिल्हाध्यक्ष भास्करराव गायकवाड यांनी, आमदार खासदार यांना मानधन पेन्शन मिळते . त्याच न्यायाने ज्येष्टांना १०००० रुपये सन्मानधन मिळावे, ज्येष्ठांना सर्व क्षेत्रात सवलती दिल्या जाव्यात . ज्येष्टांचे विधीमंडळात प्रलंबीत असलेले विधेयक मंजुर व्हावे, ज्येष्टांच्या साठीच्या भवनाला आटपाडी शहारात जागा मिळावी . त्यासाठी पत्रकारानींही आवाज उठवावा . देशातील १५ कोटी ज्येष्ट नागरीकांसाठी आमच्या संघटनेची प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे . संघटना वाढीसाठी एकजुटीचे प्रयत्न व्हावेत . शिवाय ज्येष्टांना शासनाच्या सोयी सुविधा मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे प्रयास यावर मार्गदर्शन करण्यासाठी शासन स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीर आयोजित करण्याचा मानस या मान्यवर द्वयीनी बोलून दाखविला .
आटपाडी तालुका क्रांतीकारकांची, लढवय्यांची भुमी आहे . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील पाणी चळवळीसह अनेक आंदोलने चळवळींना या भुमीतुनच यश मिळाले आहे . बळ मिळाले आहे . सर्वसमावेशक सांघीक शक्तीच्या जोरावर आपण ज्येष्टांच्या अनेक प्रश्नावर मार्ग काढण्यात यशस्वी होवू असे मत आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते डी . एम . पाटील सर यांनी व्यक्त केले .
दै . प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी सर्व पत्रकारांच्या सत्काराबद्दल संघटनेचे आभार मानले .
यावेळी ज्येष्टांचे नेते नंदकुमार राक्षे, दत्तात्रय मोकाशी, अनिलराजे देशमुख, नामदेवराव पाटील, भास्कराव चोथे, नागनाथ गोडसे, काशीनाथ गायकवाड, सौ . गुलशन वंजारी, सौ . राबियॉबसरी खाटीक, विजया चांडवले, निर्मला चव्हाण, सुमन गोडसे, लक्ष्मी मोटे, रेणुका राक्षे, लक्ष्मी भिसे, हणमंतराव राक्षे, रामचंद्र भिसे, महादेवराव कोळी, शिवाजीराव देशमुख, मारुती देशमुख, आनंदराव गायकवाड, व्ही . पी . देशमुख, बाळासाहेब गायकवाड इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
प्रारंभी प्रार्थना सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात झाली . आणि पसायदानाने सांगता करणेत आली .

Post Views: 12
Previous Post

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

Next Post

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207713

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!