गेल्या 24 वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने 25 व्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.
घोडे असलेल्या व सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकापासून सुरु झाली. पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी-मार्ट या मार्गाने येऊन ही मिरवणूक शाळेत संपन्न झाली.
मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार मा. श्री. सुभाषबापू देशमुख, मा. पोलिस उपायुक्त श्री. प्रितम यावलकर व इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. ए. डी. जोशी सर, इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन श्री. अमोल जोशी सर, इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे डायरेक्टर सौ. सायली जोशी मॅडम यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.
उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरचे आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने कायम ठेवले आहे.
इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड, सीबीएसई, मॉडेल पब्लिक स्कूलमधील इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केले. नऊवारी साडी, फेटा, महाराष्ट्रीयन साज घातलेल्या विद्यार्थिनींनी तसेच पारंपारिक वेशभूषा केलेल्या व फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना म्हणत ङ्कगपणती बाप्पा मोरयाङ्ख च्या गजरात पुणेरी ढोल पथकाचे अप्रतिम सादरीकरण केले.
पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपारिक वेशभूषा केलेल्या व लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थिनी शोभून दिसत होत्या.
इंडियन मॉडेल स्कूल सी.बी.एस.ई.व मॉडेल पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. तसेच इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी कमळ, स्वस्तिक या आकारांमध्ये झांज व झेंडा सादरीकरण केले. आपल्या पारंपारिक मैदानी खेळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी, मल्लखांब अशा विविध खेळांचे प्रदर्शन मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले.
दावत चौकापासून पतंजली मार्ट, गोविंदश्री, डी.मार्ट या मार्गाने इंडियन मॉडेल स्कूल येथे श्री गणरायाची प्रतिष्ठापना आरती होऊन विसर्जित झाली.
या मिरवणूकीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री. विजय कबाडे सर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) मा.
सौ. वृष्टी जैन मॅडम, पोलिस उपायुक्त (गुन्हे) मा.सौ. डॉ. अश्विनी पाटील मॅडम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. इंद्रजित पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. शहाजी पवार, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सुहास चव्हाण सर या मान्यवरांनी मिरवणूकीमध्ये उपस्थिती लावून श्रीं ची पूजा केली व मिरवणुकीची शोभा वाढवली.
शाळेत आल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना व पूजा मा. आमदार देवेंद्रजी कोठे व सौ. मोनिका कोठे तसेच पोलिस आयुक्त मा. श्री. एम. राजकुमार आणि मा.सौ. डॉ. रम्या कन्नन यांच्या हस्ते संपन्न झाली.
या मिरवणुकीची संकल्पना इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे डायरेक्टर सौ. सायली जोशी मॅडम यांची आहे. या मिरवणुकीमध्ये 510 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्रशालेतील या वर्षीचे आकर्षण केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सुप्रसिध्द श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा अतिशय भव्य देखावा इंडियन मॉडेल स्कूल येथे उभा करण्यात आला आहे. 30 फूट लांबीची श्री पद्मनाभ स्वामींची मूर्ती प्रशालेतील कला शिक्षकांनी तयार केली आहे. मूळ मंदिराप्रमाणे इथेही तीन दरवाज्यांमधून या मूर्तीचे दर्शन घडते. कलाशिक्षक श्री. अनिल रॉय, श्री. शैलेश कुलकर्णी, श्री.निलेश क्षिरसागर, सौ राधिका देवनपल्ली, श्री. दिपक पाटील यांना प्रतिकृती तयार करण्याचे श्रेय जाते. विद्यार्थ्यांमध्ये इंडियन मॉडेल स्कूल नेहमीच आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून विविध पौराणिक देखावे दरवर्षी उभे करते. इंडियन मॉडेल स्कूलच्या पुणे व मुंबई येथील शाळांमध्ये सुद्धा अष्टविनायक व शनिवार वाडा या कलाकृती उभ्या केलेल्या आहेत.
गेली 25 वर्ष डीजेमुक्त, डॉल्बीचा वापर न करता फक्त पारंपारिक वाद्यांची मिरवणूक इंडियन मॉडेल स्कूल तर्फे उत्साहाने साजरी केली जाते व याद्वारे ध्वनी प्रदूषण करू नये हा संदेश विद्यार्थ्यांना दिला गेला.
यावेळी इंडियन मॉडेल स्कूल्सच्या प्राचार्या सौ. अपर्णा कुलकर्णी, सौ. ममता बसवंती, सौ. अचला राचर्ला, सौ. आदिती कुलकर्णी, सौ. सुजाता बुट्टे, सौ. मानसी जोशी, सौ. स्वाती कारंडे, सौ. गौरी दातार, रुही काझी, सौ. अक्षया कुलकर्णी, ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रवीण देशपांडे व श्री. मनोज साळुंखे उपस्थित होते.
ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशांत पुणेकर, राहुल बिटोडकर, अभिजीत (बंटी) सोनके, नितीन बिराजदार, रमेश अंजिखाने, सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.