सोलापूर – महाराष्ट्र राज्यात २ जानेवारी १९६१ रोजी राज्यस्तरीय पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २ जानेवारी रोजी पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो. यानिमित्ताने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील के. एल. ई. इंग्लिश मीडियम स्कूल, जुळे सोलापूर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, विजापूर रोड, सोलापूर, कॅम्प शाळा, सोलापूर या शाळांमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तालयातील कामकाजाची माहिती देण्यात आली. तसेच पोलीस रेझिंग डेचे महत्त्व, डायल ११२ सेवा, सायबर सेलचे कार्य, तसेच पोलीस दलातील शस्त्रांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने व पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे तसेच महिला पोलीस अधिकारी व अंमलदार शीतल माने, सीमा खोगरे, सरस्वती घाडगे, इंदिरा राठोड, कविता डांगे, नसीमा शेख, निलम माळवे, अरुणा परब, सविता म्हेत्रे, उषा मळगे, प्रिया ढेपे व सुजाता जाधव यांनी यशस्वीरीत्या केले.
या कार्यक्रमासाठी एकूण सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















