सोलापूर : इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनतर्फे (सेडा) दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती ‘सेडा’चे अध्यक्ष डॉ. सूरजरतन धूत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमांतर्गत होम मैदानावर भव्य स्वरुपात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर , टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस्चे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्रो २०२६’’ चे आयोजन केले आहे. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक तर विझेडवाय टीव्ही , लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, अपार केबल्स , हाईफा इलेक्ट्रिकल्स् , हे सह प्रायोजक असून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे शैक्षणिक सहपप्रायोजक व सेटिसफाईड मीडिया प्रा. ली. हे सहप्रोजक आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. व्हिप्लस कंपनीचे सीइओ संदीप पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले.
७ दिवस चालणा ऱ्या इलेक्ट्रो २०२६ या प्रदर्शनाचे हे २६ वे वर्ष असून सोलापूर शहर जिल्हा व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगाणा व इतर आजूबाजूंच्या शहरातील सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स.११ ते रा.९. ३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी,फ्रिज , साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोवेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, कॉम्प्युटर, लॅपटॉप प्रिंटर्स, नेटवर्किंग- वायफाय प्रॉडक्ट्स , बिझनेस सॉफ्टवेअर, सोलार सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर,फूड प्रोसेसर , आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.
सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२५ ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता . यावर्षी सुमारे ३६० स्टॉल्स असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे एआय वर आधारीत टीव्ही ची नवीन 100 ते 120 इंचची श्रेणी, सोलार चार्जर स्टेशन, डिजिटल होम अप्लायन्सेस, बारकोड स्कॅन केल्यावर घरबसल्या संपूर्ण माहिती, सह ५ वेगळे डोम्स (जर्मन हँगर) मध्ये प्री फॅब्रीकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स असणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय , मोफत पार्किंग तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे.
सर्व स्टॉल मध्ये जवळपास 450 विविध कॉलेजमधील पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना सेडा मार्फत ट्रेनिंग देवून ग्राहक सेल्स माहिती देण्यात येणार आहे .या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनसाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे.
पत्रकार परिषदेस सेडाचे उपाध्यक्ष भूषण भुतडा, सचिव हरीश कुकरेजा , खजिनदार सुयोग कालाणी, सहसचिव गिरीश मुंदडा , संचालक सर्वश्री चंद्रकांत शाहपुरे, बसवराज नवले , विजय टेके व संस्थेचे माजी अध्यक्ष आनंद येमूल, ईश्वर मालू ,शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, केतन शाह आदी उपस्थित होते.
ग्राहकांना स्टॉलची माहिती क्यूआर कोडवर
संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त मोफत पार्कींगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर व सहभागी स्टॉल्सची माहिती क्यूआर कोडद्वारे सर्वांना त्यांच्या मोबाईलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली आहे, असे माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले.

























