Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात १२ फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो  प्रदर्शन 

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in solapur
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनतर्फे (सेडा) दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होम  मैदानावर फेब्रुवारीपासून इलेक्ट्रो  प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती ‘सेडा’चे अध्यक्ष डॉ. सूरजरतन धूत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

           या उपक्रमांतर्गत होम  मैदानावर  भव्य स्वरुपात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स  डिलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर , टेलिकम्युनिकेशन,  होम अप्लायन्सेस, सोलार  सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस्चे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्रो २०२६’’ चे आयोजन केले  आहे. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्ही प्लस  हे मुख्य प्रायोजक  तर विझेडवाय टीव्ही , लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, अपार केबल्स , हाईफा इलेक्ट्रिकल्स् ,  हे सह प्रायोजक असून  एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे शैक्षणिक सहपप्रायोजक व सेटिसफाईड मीडिया प्रा. ली. हे सहप्रोजक आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी  सायं. ५ वा. व्हिप्लस कंपनीचे सीइओ संदीप पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले.

७ दिवस चालणा ऱ्या इलेक्ट्रो २०२६ या प्रदर्शनाचे हे २६ वे वर्ष असून सोलापूर शहर जिल्हा व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगाणा व इतर आजूबाजूंच्या शहरातील सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात. दररोज  दु. ४ ते रा. ९.३०  व रविवारी स.११ ते रा.९. ३० पर्यंत चालणाऱ्या  या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून  एलईडी,फ्रिज , साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग  मशीन, डिश टिव्ही, मायक्रोवेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, कॉम्प्युटर, लॅपटॉप प्रिंटर्स, नेटवर्किंग- वायफाय  प्रॉडक्ट्स , बिझनेस सॉफ्टवेअर, सोलार   सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर,फूड  प्रोसेसर , आटा चक्की, एअर कुलर, वॉटर  प्युरीायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या  योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच  फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.

सेडा तर्फे आयोजित  केलेल्या इलेक्ट्रो २०२५ ला  स्टॉल  धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता . यावर्षी सुमारे ३६० स्टॉल्स असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे एआय वर आधारीत  टीव्ही ची नवीन 100 ते 120 इंचची श्रेणी, सोलार चार्जर स्टेशन, डिजिटल होम अप्लायन्सेस, बारकोड स्कॅन केल्यावर घरबसल्या संपूर्ण माहिती, सह  ५ वेगळे डोम्स (जर्मन हँगर) मध्ये प्री फॅब्रीकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स  असणार आहेत. 

 या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय , मोफत  पार्किंग तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय  केलेली आहे. भेट देणाऱ्या  ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ  काढण्यात येणार आहे. 

सर्व स्टॉल मध्ये जवळपास 450 विविध कॉलेजमधील  पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना सेडा मार्फत  ट्रेनिंग देवून ग्राहक सेल्स   माहिती देण्यात येणार आहे .या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनसाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे. 

         पत्रकार परिषदेस सेडाचे उपाध्यक्ष भूषण भुतडा,  सचिव हरीश कुकरेजा , खजिनदार सुयोग कालाणी, सहसचिव गिरीश मुंदडा ,  संचालक सर्वश्री चंद्रकांत शाहपुरे, बसवराज नवले ,   विजय टेके व संस्थेचे माजी अध्यक्ष आनंद येमूल, ईश्वर मालू ,शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, केतन शाह  आदी उपस्थित होते.

ग्राहकांना स्टॉलची माहिती क्यूआर कोडवर 

संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त मोफत  पार्कींगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर व सहभागी स्टॉल्सची माहिती क्यूआर कोडद्वारे सर्वांना त्यांच्या मोबाईलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली आहे, असे माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले.

Post Views: 108
Previous Post

रेल्वे प्रवासात हरवलेली सोन्याची साखळी केली परत

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

ताज्या बातम्या

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #solapurnews #viral

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

वाहनांना १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य; नियमभंग केल्यास १,००० रुपयांचा दंड #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866733

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697