सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सोलापूर माहे. मार्च 2026 संचालक मंडळाच्या च्या मासिक बैठकीमध्ये कालावधी संपल्याने रिक्तझालेल्या तज्ञ संचालक या पदावर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या महिला संघटक व मनपा मराठी मुलींची केंद्रशाळा कॅम्प च्या सहशिक्षिका सौ. स्नेहा सदाशिव पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा कालावधी हा दीड वर्षाचा असणार आहे.
तज्ञ संचालक पदी निवडीचे पत्र त्यांना चेअरमन नागेशपुरी गोसावी यांच्या हस्ते देण्यात आले. सदर संचालक मंडळाच्या बैठकीस चेअरमन नागेश गोसावी, व्हाईस चेअरमन जहारा नकदेकर, संचालिका स्वाती शिंदे, शाहीन शेख, गंगाधर कांबळे, मुद्देसरपाषा पिरेजादे, कृष्ण परमेश्वर सुतार,केशव गलगली आदी संचालक, व्यवस्थापक समर्थ जाधव व लिपिक शाकीर शेख,तसेच प्रसन्न निकंबे, किरण शेळगे,उमेश युवनाती, संतोष सुतार राहुल पाटील, विशाल मनाळे, आरती शिवशरण, शितल लष्कर, आप्पासाहेब ककमारे, मिलिंद खंदारे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संचालक कृष्ण परमेश्वर सुतार तर आभार माजी संचालिका आसमा शेख यांनी मानले.
———




















