सांगोला – सांगोल्यातील शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले.
चिंचोली रोड उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शहीद पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी माजी सैनिक कल्याणकारी संस्था पदाधिकारी उत्तम चौगुले, भाऊ निमग्रे, तानाजी मेटकरी, मेजर माणिक बाबर, जय जवान माजी सैनिक संस्थेचे रवींद्र मराळ, डॉ.कृष्णा इंगोले, संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले, सचिव संतोष महिमकर, महादेव दिवटे, देवा मासाळ यांचेसह ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























