सोलापूर – येथील भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती सोलापूरच्या वतीने दिनांक 30 मार्च 2026रोजी 2026-27 या वर्षात होणाऱ्या जनगणने मध्ये भटके विमुक्तांसाठी स्वतंत्र रकाना करून घर सुचीकरण प्रक्रियेत भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र नोंद नसल्यामुळे पाल तांडा झोपडी किंवा उघड्यावर राहणाऱ्या समाजाची नोंद होणार नाही.
जनगणनेत भटके विमुक्त असा रकानात समाविष्ट करावा या साठी लोकसभेच्या संसद अधिवेशना मध्ये भटके विमुक्ताचे प्रश्न मांडून ठराव करण्यात यावा यासाठी खा, प्रणिती शिंदे यांचे प्रतिनिधी सातलिंग शटगार यांना निवेदन दिले , यावेळी यशवंत फडतरे मल्ल्या सूर्यवंशी रोहिणी गायकवाड वैशाली बनसोडे यांची भाषणे झाली.
कीर्तीपाल शिवशरण विश्वास नागटिळक, शोभा गायकवाड मार्था असादे अंजली सितारे क्रांती आठवले सुनिता मरिआईवाले सुषमा कांबळे रंका मरिआईवाले शोभा हिराबाई मरीआईवाले अंबादास जाधव केवल फडतरे इत्यादी उपस्थित होते प्रा, यशोधरा धोत्रे यांनी आभार मानले

















