सांगोला – पाटील वस्ती, आलेगाव (ता.सांगोला) येथील इ.१० वी मध्ये शिकत असलेली मोहिनी दत्तात्रय पाटील हिला सर्प दंश झाला होता. त्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती.
घरची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे दवाखान्याचा खर्च पेलवत नव्हता. त्यामुळे त्यांनी समाजाला आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आपुलकी मिञ मंडळ, कडलास (ता.सांगोला) या संस्थेमार्फत अध्यक्ष प्रा.डाॅ.बबन गायकवाड व उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांनी तीच्या घरी जाऊन तिच्या आरोग्याची विचारपूस करून २ हजार ५०० रु.ची मदत केली.
















