हदगाव – भाजपा हदगाव पश्चिम मंडळात दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन विविध सत्रा अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती सरकारची कामगिरी, भाजपाचा इतिहास व विकास यासह विविध विषयांवरती कार्यशाळेचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाल्याची माहिती भाजपा पश्चिम मंडळाध्यक्ष सूर्यकांत हनवते यांच्याकडून प्राप्त झाली.
सदर शिबिराच्या वेळी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक प्रमुख वक्ते, विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, बूथप्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराविषयी माहिती देताना सूर्यकांत हनवते म्हणाले की, या दोन दिवसीय शिबिरामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला चांगले यश संपादन करण्याकरिता सोपे जाणार असून आम्ही पूर्ण ताकदनिशी या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे कळविण्यात आले तर एक प्रकारे या निवडणुकांसाठी रणसिंग फुंकून भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवसीय कार्य शाळेत विविध सत्रा अंतर्गत अनेक विषयांवरती सखोल माहिती प्रमुख वक्ते कडून कार्यकर्त्यांना देण्यात आली एकूण सात सत्रा चे आयोजन होते तर कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शन भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष सूर्यकांत हनवते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, बुथ प्रमुख सह कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने हजेरी होती.
















