बार्शी – येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक विचारवंत, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी ते प्रथमता क्रांतीसुर्य म.फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त ग्रंथपाल अशोक गवळी यांचे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांत ठोकळ हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहासबप्पा सुतार, गायक सुनिल फल्ले, भागवत बोबडे, शाम जानराव, राहुल लोंढे, अश्वस्त गुरव यांचेसह सभासद व वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.






















