Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पण रिक्षा चालकांना न्याय मिळवू देऊन ; आडम मास्तरांचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
April 14, 2026
in editor
0
पण रिक्षा चालकांना न्याय मिळवू देऊन ; आडम मास्तरांचा इशारा
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी सोलापूर बंद करण्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दत्तनगर येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुनम गेट या मार्गावर हा महामोर्चा काढण्यात येणार असून, मोर्चाचे नेतृत्व स्वतः कॉ. आडम मास्तर करणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने रिक्षा चालक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

     

सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून आहे. मात्र, शहरातील अनेक एलपीजी पंप बंद असल्याने चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उपलब्ध पंपांवरही अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय एलपीजीच्या वाढत्या दरामुळे चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

     या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल रोजी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी, रिक्षा संघटना प्रतिनिधी आणि पंप चालक यांची संयुक्त बैठक १० एप्रिलपर्यंत घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही बैठक झालेली नसल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. कॉ. आडम मास्तर यांनी या संदर्भात पुन्हा पालकमंत्र्यांना पत्र देत तातडीने संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे. सध्या शहरातील सात एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शहरातील सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करणे, गॅस दरात कपात करणे तसेच नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

      या महामोर्चाला विविध रिक्षा संघटना व वाहतूक संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले. कृती समितीच्या वतीने सर्व रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस ॲड. अनिल वासम, चाँदसाब मुजावर, शाबूद्दीन शेख, रफिक काझी, प्रदीप शिंगे, राजू शिदगणे, अमोल दुरके, रियाज सय्यद, कॉ. एम. एच. शेख, युसुफ शेख, महिपती पवार, अतिश शिंदे, अकील शेख, आसिफ पठाण आदी उपस्थित होते.

सात गॅस पंप बंद; रोजगारावर परिणाम

सध्या शहरातील सात एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. यामुळे दैनंदिन उत्पन्न घटल्याने चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

 

 प्रमुख मागण्या काय?

रिक्षा चालकांच्या मागण्यांमध्ये सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करणे, गॅस दरात कपात करणे तसेच नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

Post Views: 116
Previous Post

महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण 

Next Post

अण्णासाहेब पाटील योजनेच्या धोरणामध्ये केलेले बदल मागे घ्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अण्णासाहेब पाटील योजनेच्या धोरणामध्ये केलेले बदल मागे घ्या

अण्णासाहेब पाटील योजनेच्या धोरणामध्ये केलेले बदल मागे घ्या

ताज्या बातम्या

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

July 15, 2026

दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती 

July 15, 2026
राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

July 15, 2026
आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

July 15, 2026
अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

July 15, 2026
गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

July 15, 2026
करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

July 15, 2026
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

July 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0978350

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!