सोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू-वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा
तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह
कर्तृत्ववानांचा होणार सन्मान
सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, शाखा सोलापूरच्या वतीने शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सोलापूरातील अॅचिव्हर्स हॉल येथे नाभिक समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष वैभव शेटे आणि जिल्हाध्यक्ष संजय चिकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी ११ वाजता होणाऱ्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात नाभिक समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींच्या पालकांना एकत्र आणण्याबरोबरच ‘शिवयोग’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार असून विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांना कला गौरव पुरस्कार, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘शिक्षक-मित्र’, प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांना ‘शिक्षक भूषण’, तर संजय चिकले जीवन गौरव पुरस्कार, बापूराव चव्हाण -राज्यस्तरीय ज्ञानज्योती गौरव पुरस्कार, राम डिंगे – समाज भूषण, सुरेश शिंदे – जीवन गौरव पुरस्कार, किरण भांगे , शिवशरण सुरवसे आणि सुदर्शन विभुते यांना समाज रत्न या विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना शाल, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात समाजातील दोन विवाह संपन्न होणार असून नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देणार आहेत.हा कार्यक्रश्री स्वकुळसाळी समाजातर्फे
वधू-वर पालक परिचय मेळावाम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी, युवक संघटना, जिल्हा व शहर पदाधिकारी तसेच समाजबांधव परिश्रम घेत आहेत.
या पत्रकार परिषदेस श्रीकांत राऊत, आनंद वाघमारे, बापूराव काळे, संदीप पवार, मनोज डिगे, सहदेव वाघमारे, प्रदीप मोरे , संजय चिकले आदी उपस्थित होते.
==================
श्री स्वकुळसाळी समाज
वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
सोलापूर : श्री स्वकुळसाळी समाज सोलापूर ज्ञातीचे विठ्ठल मंदिर, बेगम पेठ यांच्यावतीने रविवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड येथील श्री महालक्ष्मी बँक्वेट, एमआयडीसी, सोलापूर येथे भव्य देशपातळीवरील वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष परमेश्वर गदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्याच्या उद्घाटनासाठी उद्योगपती उदयकुमार दुधाणे उपस्थित राहणार असून, कौटुंबिक समुपदेशक सोनाली कोदे-वाई यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. “लग्नानंतर सुखी संसार कसा टिकवावा, मतभेद कसे हाताळावेत आणि एकमेकांना समजून घेण्याची गरज काय,” यावर त्या मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात युवक-युवती आणि पालकांना समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळणार असून, कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वभाव आणि विचार जाणून घेणे अधिक सोपे होणार आहे. मेळाव्यासाठी आतापर्यंत ५०० विवाहयोग्य उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सहभागींपैकी सुमारे ६० टक्के उमेदवार शहरी, तर ४० टक्के ग्रामीण व निमशहरी भागातील असल्याने सामाजिक व सांस्कृतिक समन्वयाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
ग्रामीण भागातील पालकांची अडचण लक्षात घेऊन ऑफलाईन नोंदणी केंद्रांची सुविधा देण्यात आली असून, तरुणांसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे बायोडाटा व फोटो अपलोडची व्यवस्था करण्यात आली आहे.
घटस्फोटीत, विधूर-विधवा तसेच दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्विवाहासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्यात आले असून, त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष परमेश्वर गदगे व वधू-वर परिचय मेळावा समितीचे मोहन काजळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस ॲड. ज्ञानेश्वर डिंगणे, अंबरनाथ सरवदे , ज्ञानेश्वर एडके, आनंद कोंगे, यशवंत एकबोटे ,अमरनाथ सपात आदी उपस्थित होते
=====