सोलापूर : मागील २० वर्षांपासून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत मुस्लिम पाछा पेठ सोलापूर येथील रहिवासी हाजी अब्दुल सत्तार जाफर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करून २९ मे २०२६ रोजी चिरागअली कब्रस्तान येथे जिवंत समाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
हाजी अब्दुल सत्तार जाफर शेख हे मागील ४० वर्षांपासून चिरागअली कब्रस्तान वक्फ ट्रस्टच्या जागेत भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत. ते ज्येष्ठ नागरिक असून, वक्फ ट्रस्टच्या स्वयंघोषित ट्रस्टींकडून गेल्या १५ वर्षांपासून मानसिक त्रास व आर्थिक नुकसान केल्याचा आरोप त्यांनी अर्जात केला आहे.
तसेच त्यांच्या दुकानाला आग लावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच दुकानातील साहित्य चोरी करून नेणे अशा घटना घडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.आजपर्यंत २५ ते ३० लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तांकडे
मागील १५ वर्षांत २५ ते ३० तक्रारी दाखल करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जागेचा वाद वक्फ बोर्डाशी संबंधित असल्याचे सांगून पोलीस प्रशासन हस्तक्षेप करत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित जागेचा वाद वक्फ ट्रिब्युनल, औरंगाबाद येथे प्रलंबित असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
२८ मे २०२६ पर्यंत न्याय न मिळाल्यास २९ मे रोजी चिराग रेसिडेन्सी शेजारील दुकानाच्या जागी स्वतः खड्डा खणून जिवंत समाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असून, त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...