स्वागत नगरात मानसिक तणावात महिलेची फिनेल पिऊन आत्महत्या
सोलापूर – मानसिक तणावात एका 52 वर्षीय महिलेने रहात्या घरात फिनेल पिऊन आत्महत्या केल्याची घटना स्वागत नगर येथे आज मंगळवारी पहाटे घडली.
मनीषा नंदकुमार सुरवसे (वय 52 वर्ष , रा . स्वागत नगर सोलापूर ) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. त्यांनी घरात मानसिक टेन्शनमुळे घरातील फीनेल पिऊन टाकले . ही घटना घरच्यांना समजून आल्यावर सदर महिलेला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात पहाटे अडीच वाजता नानासाहेब माने यांनी दाखल केले असता तिचा उपचार दरम्यान सकाळी सहा वाजता मृत्यू झाला .
तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून बालकास उचलून आपटले
सोलापूर – तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध तक्रार का दिली असे म्हणून एका इसमाने एका सात वर्षाच्या मुलास उचलून खाली आपटल्याची घटना मोदी भागातील मधुकर उपलप वस्ती येथे रविवारी रात्री घडली .
सदर बालक हा रविवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घराजवळ असताना त्याला नरसिंग अलजेंडे यांनी उचलून खाली आपटले . यात मुकामार लागून त्रास होऊ लागल्याने त्याला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात वडील सिद्धलिंग यांनी आज मंगळवारी सकाळी दाखल केले .
Post Views: 10