सोलापूर – ‘स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची सेवा करणारे ‘नरसप्पा’ची भूमिका साकारणारे बलराज माने ‘ मंद्रूपच्या नागरीकांना सोईसुविधा मिळवून देण्यासाठी १ जूनला आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे यादिवशी त्यांचा जन्मदिवस असताना मंद्रूप ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहेत. विविध मालिकेतून मंद्रूपचे नाव देशभर पोहोचविणार्या कलावंताला हक्काचे सोईसुविधा मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागणे म्हणजे दुर्दैव असल्याची चर्चा सुरू आहे.
बलराज माने हे मंद्रूपमधील वाॅर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी आहेत.१८ वर्षापूर्वी त्यांना पुणे व मुंबई येथे जाऊन विविध मालिकेत व चित्रपटात भूमिका साकारले. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी पुरस्कार स्वीकारताना ‘जन्मभूमी’ मंद्रूपचा उल्लेख आवर्जून उल्लेख केला आहे. मात्र विविध कार्यक्रम व सण उत्सवाला मंद्रूपला आल्यानंतर घागर घेऊन पाण्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार आली आहे. शिवाय पाच सहा वर्षापूर्वी बनविलेला सिमेंट रस्ता खड्डेयुक्त झाल्याने पायी चालणेही मुश्कील बनला आहे. गावात अतिक्रमण वाढल्याने घरापर्यंत वाहने घेऊन जाणे मुश्कील बनले आहे. तसेच शाळा परीसरातील अतिक्रमणामधून दारू विक्री, मांसाहारी दुकाने व इतर अवैद्य धंदे सुरू असल्याने मुलांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. याशिवाय इतर सोईसुवीधा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याने बलराज माने यांनी कायमच्या ‘कटकटी’ला कंटाळून मंद्रूप ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम विरोधात लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत व इतर निवडणूकीत विविध पॅनल व पक्षाचे प्रचार करून उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलतात.
बलराज माने यांची झी मराठी, कलर्स मराठी, सन मराठी व स्टार प्रवाह चॅनलवरील ‘ बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मध्ये पाटील, ‘सुंदरी’मध्ये सरपंच, ‘फुलाला सुगंध मातीचा’मध्ये इन्स्पेक्टर, ‘रंग माझा वेगळा’ मध्ये मिनीस्टर देशमुख, ‘स्वराज्यजननी जिजामाता’मध्ये यल्या, ‘लेक माझी लाडाची’मध्ये रमणिकलाल, ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरूकुल ट्रस्टी, शिवाय ‘पृथ्वीराज चव्हाण’ हिंदी मालिकेत रूद्र भोपाला या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत. या भूमिकेतून त्यांनी मंद्रूपचे नावलौकीक केला असला तरी त्यांना गावात आल्यावर कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा ‘पवित्रा’ घेतला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















