Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी-वैराग-सोलापूर मार्गावरील ‘रामभरोसे’ एसटी प्रवास! खिळखिळ्या बसेसमुळे प्रवासी हैराण; दिवसाला ४ ते ५ बसेस पडताहेत बंद

तरुण भारतbyतरुण भारत
June 12, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

वैराग – बार्शी-वैराग-सोलापूर या मुख्य राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव सध्या अक्षरशः मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था इतकी भयानक आणि बिकट झाली आहे की, दिवसाला किमान चार ते पाच बसेस या रस्त्यावर कुठे ना कुठेतरी बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत. निकृष्ट आणि तोडक्या-मोडक्या अवस्थेतील या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जात असल्याने, एसटीचा हा प्रवास आता पूर्णपणे ‘रामभरोसे’ झाला असल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या तडाक्यात प्रवाशांचे हाल; कुठेही अन् कधीही बंद पडतात बसेस!
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणावर आहे. अशा कडक उन्हात भर रस्त्यात बस कधी आणि कुठे बंद पडेल, याचा काहीच नेम राहिलेला नाही. दिवसातून तिसरी-चौथी बस रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभी असलेली प्रवाशांना रोजच पाहायला मिळत आहे. बस अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळत राहावे लागते. त्यानंतर येणारी दुसरी बस आधीच हाऊसफुल्ल असल्याने त्यात वृद्ध, महिला, गरोदर माता, लहान मुले आणि ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उभे राहून किंवा लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. एखाद्याला रुग्णालयात उपचारासाठी जायचे असल्यास किंवा काही तातडीचे काम असल्यास, बस बंद पडल्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत आणि प्रवाशांना विनाकारण मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
योजनांपेक्षा बसेसची दुरुस्ती अन् टापटीपपणा महत्त्वाचा!
एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्धे तिकीट (हाफ तिकीट) सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, प्रवाशांचे म्हणणे आहे की, सध्या अशा फुकट किंवा सवलतीच्या योजना देण्यापेक्षा बसेस चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.
बसेस स्वच्छ असणे,
खिडक्या आणि सीट व्यवस्थित असणे,
बसेस तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.
सध्याच्या बसेसची दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ प्रशासन आणि राज्याचे परिवहन मंत्री नेमकं काय करत आहेत? डोळे झाकून ते या परिस्थितीकडे का पाहत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या खिळखिळ्या बसेसमुळे यापूर्वीही काही अपघात व दुर्घटना घडल्या आहेत, तरीही प्रशासन जागे का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून चांगल्या बसेसची जोरदार मागणी
शहराच्या ठिकाणी कामासाठी, उपचारासाठी किंवा बाजारहाटासाठी जाणाऱ्या हजारो नागरिकांची ही हक्काची जीवनवाहिनी आता डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने आणि संबंधित परिवहन मंत्र्यांनी या गंभीर समस्येची तात्काळ दखल घ्यावी. बार्शी-वैराग-सोलापूर मार्गावरील या भंगार आणि बाद झालेल्या बसेस तात्काळ बदलून त्याऐवजी सुव्यवस्थित, टापटिप आणि चांगल्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी आता बार्शी आणि वैराग परिसरातील नागरिक व प्रवाशांमधून केली जात आहे.
Post Views: 54
Previous Post

लवकरच जनता दरबार सुरु करणार-आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख

Next Post

डोंबाळवाडी येथे कृषीदूतांचे आगमन व स्वागत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डोंबाळवाडी येथे कृषीदूतांचे आगमन व स्वागत 

ताज्या बातम्या

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1198840

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!