सांगोला – लोकांच्या मागणीचा विचार करून येणाऱ्या थोड्याच दिवसात लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी जनता दरबार सुरू करणार असल्याचे आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर केले. ते गणपतरावाजी देशमुख सहकारी सुत गिरणी, सांगोला येथे आयोजित केलेल्या शेकाप व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी उपस्थित लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
येणाऱ्या काळात नागरीकांनी सौर उर्जेचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शासन अनुदान सुध्दा देत आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. तसेच सध्या पावसाळा सुरु झालेला आहे. पाऊस काळ लांबला अथवा कमी प्रमाणात पडला तर मात्र येणारे पुढचे वर्ष अडचणीचे ठरु शकते. याचा विचार करुन शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावी व ती कधी घ्यावी याबाबत तज्ञांशी चर्चा करुन पिके घेतली पाहीजेत असा सल्ला आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिला. सदर बैठकीमध्ये पक्ष संघटना व मतदार संघातील अनेक प्रश्नांवर तसेच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
Post Views: 17