वेळापूर – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषिद्धतांचे डोंबाळवाडी येथे आगमन झाले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो. श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या यांचे डोंबाळवाडी गावात शेतकऱ्यांसमवेत आगमन झाले. कृषिदूत पुढील तीन महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
विविध पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि कृषीसोबत कृषीपूरक व्यवसाय याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध आधुनिक तंत्रज्ञान, जास्तीत जास्त उत्पन्न मिळणाऱ्य पद्धतीची माहिती कृषिदूत गावाला देणार आहेत.
तसेच उद्यान दूत रणवीर जाधव,
शिवराज देशमुख, तेजस धायगुडे, रवी होळ, आशिष कळके, तुषार मारकड, विश्वराज मस्के, हे उपस्थित होते.
उद्यानदूतांना श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शका

श्रीलेखा पाटील , उपाध्यक्ष करण पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग कोळेकर सर,कार्यक्रम समन्वयक दत्तात्रय राऊत, कार्यक्रम अधिकारी अमोल देवकाते, प्राचार्य सुगंध शिंदे , प्राध्यापक जीवन सावळकर, प्राध्यापक धीरज दोरकर, प्राध्यापिका अश्विनी फुटाणे, प्राध्यापक विजय तरंगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Post Views: 11