पंढरपूर – राज्य शासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अटी,शर्थीशिवाय सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) पक्षाच्या वतीने आमदार रोहित पाटील यांनीआपले अन्नत्याग आंदोलन अखेर सुरु केले आहे. दरम्यान वाहतूकीला अडथळा होईल हे कारण पुढेकरीत प्रशासनाकडून आमदार पवार यांना उपोषणापूर्वीच उपोषणस्थळी येवून पदाधिकाऱ्यांनानोटीस देण्यात आली. मात्र तरी देखील आमदार पवार यांनी प्रशासनाच्या नोटीशीला न जुमानता आंदोलन सुरु केले.
आमदार रोहित पवार यांचे शुक्रवारी येथे सकाळी आगमन झाले. त्यापूर्वीत्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाचीजय्यत तयारी करुन ठेवली होती. दरम्यान आमदार पवार येथे दाखल झाल्या नंतर त्यांनी शहरातीलगाडगेबाबा धर्मशाळेत येवून गाडगेबाबांच्या चरणी नतमस्तक होवून शहरातील महापुरुषांच्यापुतळ्यांना अभिवादन करीत नामदेव पायरीकडे जावून तेथूनच विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतरमंदिराला प्रदक्षिणा करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनस्थळी येवून आंदोलनासप्रारंभ केला. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नाही. हे केवळ बळीराजासाठीचे आंदोलन आहे.त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल ज्यांना ज्यांना काळजी आहे ते सर्वजण या आंदोलनात सहभागी होवू शकतात असे त्यांनीअगोदरच जाहीर केले होते. त्या प्रमाणे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदारराजु खरे यांची आमदार रोहित पवार यांच्या व्यासपीठावरील उपस्थिती डोळ्यात भरणारी ठरली.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्ह्यातील कोणतेही वजनदार नेते,पदाधिकारी मात्र या आंदोलनस्थळी दिसून आले नाहीत.
——————-
चौकट : ( आंदोलन नव्हे इव्हेंटच ) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठीचे हे आंदोलन असल्याचे आमदार रोहितपवारांकडून जरी जाहीर केले गेले असले तरी त्या आंदोलना बद्दल आंदोलनस्थळी उलटसुलट चर्चासुरु असल्याचे ऐकावयास मिळत होते. कारण दस्तुरखुद्द पदाधिकारीच हे आंदोलन नाही तर एकइव्हेंट आहे असे खासगीत बोलत होते. आंदोलनस्थळी तसेच शहरात केल्या गेलेल्या बँनरबाजीवरुन तर हे आंदोलन नव्हे तर चक्क इव्हेंटच असल्याचे दिसून येत होते.
———————
चौकट : ( शेतकऱ्यांची उपस्थित कमी, पदाधिकारी, कार्यकर्तेच जास्त)
वास्तविक शेतकऱ्यांच्या स
रसकट कर्जमाफासाठी हे आंदोलन पुकारलेलेहोते. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची उपस्थिती डोळे दिपवणारी अशी लक्षवेधक हवी होती.मात्र शेतकऱ्यांची उपस्थिती कमी त्या ऐवजी पुणे, बारामती परिसरातून आयात केलेल्या पदाधिकारीआणि कार्यकर्त्यांची उपस्थिती डोळ्यात भरणारी दिसत होती.
————————
चौकट : ( भाविकांना कमालीचा
त्रास ) सध्या अधिक महिना सुरु आहे.
पंढरपूरात गर्दी वाढत आहे. त्यामध्येचआमदार रोहित पवारांकडून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर बँरेकेडींग उभारण्यातआले आहे. त्यामुळे महिला, लहानमुले तसेच वयोवृध्द भाविकांना आपली चारचागी वाहने बाजूलाउभी करुन शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरुन पायी चालत ये जा करावी लागत होती. या व्यतरिक्तआंदोलनासाठी आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनांमुळे शहरातील अनेकभागात रस्त्यांवर गाड्या पार्किंग केलेल्या दिसून आल्या. नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजीमहाराज चौकाकडे येणारा रस्ता, सावरकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता, संतपेठभागातील रस्ते अशा शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडी होताना दिसून आल्या.त्यामुळे स्थानिक नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता.
——————-
चौकट : ( अन्नत्याग नव्हे अन्नदान आहे
की काय असे चित्र )
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांकडून अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले आहे. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मात्र येथे चंगळ होतअसल्याचे दिसून आले. कारण येथील मठामध्ये पदाधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता, थंडगार पाण्याच्याबाटल्यांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे अन्नत्याग आंदोलना ऐवजी अनायसा अधिक महिनाअसल्यामुळे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे की काय असे चित्र एकंदर येथीलजय्यत तयारी वरुन दिसून आले.
———————–
चौकट : ( आंदोलनातील प्रमुख मागण्या ) २०१९ च्याकर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांनासरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. एकवेळ समझोता (OTS) योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करूनसर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्याशेतकऱ्यांसाठीही सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करावी. प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियमित कर्जफेडीची दोन वर्षांची अटरद्द करावी. २०१७ च्या कर्जमाफीस पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्यात्रुटींमुळे वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा. शेतकरी विरोधी अटी रद्द करून १ रुपयात पीकविमा योजना पुन्हाप्रभावीपणे लागू करावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करूनत्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम उपलब्ध करून द्यावी.–महेश भंडारकवठेकर १२-०६-२०२६—
Post Views: 11