सोलापूर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा निर्णय प्रत्यक्षात येत असून सरळसेवा भरती प्रक्रियेतून सोलापूर जिल्हा परिषदेला तब्बल ९९ नवे केंद्रप्रमुख मिळणार आहेत. या नव्या केंद्रप्रमुखांचे समायोजन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या उपस्थितीत आज शनिवारी नियुक्ती व समायोजन करण्यात येणार आहे.
नव्याने निवड झालेले केंद्रप्रमुख जिल्हा परिषदेत दाखल झाले असून त्यांच्या कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय देखरेखीला नवी ऊर्जा मिळणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या केंद्रप्रमुखांची कागदपत्रे तपासण्याचे काम झाल्यानंतर आज त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अधिकारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर केंद्रप्रमुख प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत झाल्याने शाळांना नियमित भेटी, शैक्षणिक निरीक्षण आणि गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक व्यवस्थेत केंद्रप्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या माध्यमातून शाळांच्या कामकाजावर देखरेख ठेवली जाते, शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाते. त्यामुळे दीर्घकाळ रिक्त असलेल्या पदांवर नियुक्ती झाल्याने ग्रामीण शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मनुष्यबळाची ही भर पडत असल्याने जिल्ह्यातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि शालेय व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कोट
संबंधित शाळा सुरू होण्याअगोदर केंद्रप्रमुखांची नियुक्ती करणे महत्त्वाचे आहे. शाळा सुरू झाल्यानंतर केंद्रप्रमुखांचे कामकाज नित्य नियमाने सुरू होणार आहे. त्यासाठी आषाढी वारी अगोदर त्यांचे सामायोजन करणे कर्म प्राप्त आहे. त्यानुसार आज केंद्रप्रमुखांचे समायोजन केले जाणार आहे.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...
सांगोला - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...