सोलापूर : अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे सिद्धेश्वर ब्लड बँक, वैशाली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून दाखवून दिली.
सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात टीचर्स प्रीमियर लीगचे सदस्य, प्रशालेतील पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्राचार्य इस्माईल शेख यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेतील सर्व ~शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबिर संस्थेचे संस्थापक हाजी बंदेनावाज शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.शिबिरादरम्यान रक्तदात्यांना आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
Post Views: 12