
टेंभुर्णी : महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी २०२६’ (MHT-CET) प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज अँड अकॅडमी, टेंभुर्णी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजच्या तब्बल १२ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेन्टाईलपेक्षा (Percentile) अधिक व १६ विद्यार्थ्यांनी ८५ पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवून संस्थेच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून विषय निहाय पर्सेंटाइल मध्ये भौतिकशास्त्र या विषयात 99.48 पर्सेंटाइल, जीवशास्त्र या विषयात 99.03 पर्सेंटाइल, रसायनशास्त्र विषयात 98.54 पर्सेंटाइल तर गणित या विषयात 97.66 पर्सेंटाइल असे उच्चांकी गुण मिळवले आहेत. भानवसे दत्तात्रय सोमनाथ याने – 97.44, कु. अटकळे सुप्रिया सोमनाथ – 97.16, कु. दळवी श्रुती दत्तात्रय – 97.00, गवळी प्रथमेश दत्तात्रय – 96.98, कु. शिरसट तनुजा राहुल – 96.64, कु. मस्के शिवानी नागनाथ – 96.49, कु. देशमुख ज्ञानेश्वरी विश्वास – 94.49, वाघमारे ओम दिलीप – 93.88, चोपडे गणेश हनुमंत – 92.73, कु. मोरे मानसी परमेश्वर – 92.24, कु. पाटील अस्मिता बाळासाहेब – 92.21, लोकरे रौनक महेंद्र – 91.48, काळे समर्थ शिवाजी – 89.45, बोधे ऋषिकेश शिवाजी – 88.88, वाघमोडे राजाभाऊ व्यंकू – 87.73, जगताप प्रथमेश प्रकाश – 87.25 पर्सेंटाइल असे गुण मिळवले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. या घवघवीत यशामुळे विद्यार्थ्यांचा नामांकित कृषी (Agriculture), अभियांत्रिकी (Engineering), आणि फार्मसी (Pharmacy) महाविद्यालयांमधील उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार जयकुमार गोरे, माढा तालुक्याचे विद्यमान आमदार मा. अभिजीत (आबा) पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजीत भैय्या बबनरावजी शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती मा. ऍडव्होकेट अमृताताई वाघे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नारायण भानवसे, विद्यालयाचे प्राचार्य विजय यादव, मुख्याध्यापक शोएब बागवान, शिक्षक-पालक संघ, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजच्या या यशामुळे संपूर्ण माढा तालुक्यातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट
*”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच आपल्या महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज व अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही शालेय स्तरापासूनच फाउंडेशनसह NEET, IIT-JEE आणि MHT-CET ची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. शिक्षकांनी अहोरात्र घेतलेले कष्ट, विद्यार्थ्यांनी स्वतःवर ठेवलेला दृढ आत्मविश्वास आणि पालकांनी दिलेली खंबीर साथ यांच्या त्रिवेणी संगमामुळेच हे दैदीप्यमान यश शक्य झाले आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपली संस्था कायम विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या व पालकांच्या सोबत असेल. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!”*
*श्री. नारायण भानवसे (संस्थापक अध्यक्ष – ज्ञानदीप शिक्षण संस्था टेंभुर्णी)*
Post Views: 15