पंढरपूर – येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची कल्याण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून राजेंद्र शेळके बदली व्हावी म्हणून प्रयत्न करत होते; अखेर त्यांना यश आले असून त्यांची शासनाने पंढरपूर येथून कल्याण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यामुळे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे.
आषाढी यात्रेची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र यात्रेच्या अगोदरच राजेंद्र शेळके यांची बदली झाली असल्याने आषाढी यात्रेची कामे करताना मदिर प्रशासनाला अडचणीला सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 11