सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिवछत्रपती रंगभवन समोरील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आणि परिसराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला गती मिळाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या कामासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्यात येणार असून, त्यामुळे उद्यानाबाहेरील रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पुतळा तिन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसणार आहे. सध्या झाडे व इतर अडथळ्यांमुळे पुतळ्याचे दर्शन मर्यादित होत असल्याची भावना अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली होती.
याशिवाय उद्यानात आकर्षक माहिती फलक, शिवकालीन वास्तुशैलीवर आधारित सजावटीची रचना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ उद्यान न राहता इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी अभ्यासपूर्ण केंद्र ठरणार आहे.
कामाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षी ६ जून रोजीच्या शिवराज्याभिषेक दिनापर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद उद्यानाचा नवा चेहरा समोर येणार असून, शिवरायांच्या स्मारकाला अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूप प्राप्त होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कोट
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवस्मारकासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्याचे लवकरच काम सुरू होणार असून, साधारण १ वर्षांत याचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...