पंढरपूर – राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात प्रवासी राजा दिन या उपक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा, सुविधांमधील अडचणी,समस्या,तक्रारी व सुचना ऐकून घेऊन जिल्हास्तरावरील अधिकारी व आगार प्रमुखांनी उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करावे व सेवेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात असे आदेश महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक आगारात एका बुधवारी प्रवासी राजा या उपक्रमाचे नियोजन केलेले आहे. यावेळी जिल्हास्तरावरील एसटी चे अधिकारी व संबंधित आगार प्रमुख उपस्थित राहून प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करणार आहेत.
तरी प्रवाशांनी,प्रवासी ग्राहक संघटनांनी खालीलप्रमाणे आगारानिहाय बुधवारी दु ११ते १ यावेळेत संबंधित आगार प्रमुख कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांतसदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख आदींसह ग्राहक पंचायतीच्या इतर सदस्यांनी केले आहे.
———————–
चौकट : ( सोलापूर जिल्ह्यातील प्रवासी राजा दिन )
आगारनिहाय – पंढरपूर (दि.२४ जून), बार्शी ( दि.१जुलै), अक्कलकोट (दि.८ जुलै) आणि अकलूज (दि.१५ जुलै ).
Post Views: 13